fbpx

Ind vs WI : भारताचा आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना

टीम महाराष्ट्र देशा– भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सुरू असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज होणार आहे. हा सामना पोर्ट ऑफ स्पेन च्या क्वीन्स पार्क ओवल मैदानावर खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल.

गयानातील पहिला सामना १३ षटकानंतर होऊ शकला नाही. दुस-या वन डे दरम्यान चांगले ऊन असेल आणि पावसाचा फटका बसणार नाही, अशी भारताला तसेच विंडीजला आशा असेल.

लेविसला गवसलेला सूर वेस्ट इंडिजसाठी दिलासादायक आहे. मात्र धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल कारकीर्दीमधील अखेरच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात अपयशी ठरला, ही वेस्ट इंडिजसाठी तीव्र चिंतेची बाब आहे.

तर दुसऱ्या बाजूला स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या टीम इंडियात चौथ्या क्रमांकासाठी आता मुंबईच्या श्रेयस अय्यरला पडताळून बघितले जाते आहे. या लढतीत श्रेयसला चौथ्या क्रमांकावर संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

संघ

भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाय होप, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, रोस्टन चेज, फॅबियन अलेन, कार्लोस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस आणि केमार रोच.