fbpx

भीषण अपघात : लखनऊ-दिल्ली मार्गावर बस नाल्यात कोसळून २९ जणांचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : लऊनऊ-दिल्ली मार्गावर बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत २९ जणांचा जागीत मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही बस सोमवारी सकाळी यमुना एक्सप्रेसवर नाल्यात कोसळली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. या घटनेसंदर्भात युपी पोलिसांनी ट्विट केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘अवाध बस डेपोची बस नंबर UP33 AT 5877 या गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती यमुना एक्सप्रेस येथील जर्ना नाल्यात पडली आहे.

 

दरम्यान, या घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींपर्यंत आवश्यक मदत पोहोचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.