अंबुलगा कारखान्यातील गोंधळप्रकरणी ना.निलंगेकरांसह २९ जण निर्दोष

टीम महाराष्ट्र देशा(प्रा.प्रदीप मुरमे)- लातूर जिल्ह्यातील अंबुलगा येथील डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी तत्कालीन आमदार व विद्यमान कौशल्य विकास,कामगारमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह २९ जणांची निलंगा येथील अतिरिक्त जिल्हा सञ न्यायाधीश एम.एस.पठाण यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

अंबुलगा (ता.निलंगा) कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संभाजीराव पाटील यांनी वेळोवेळी आंदोलने उभी केली.या कारखान्याच्या विरोधात वेळोवेळी उभा केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे संभाजीराव यांच्या रुपाने एक उमदं व संघर्षमय नेतृत्व लातूर जिल्ह्यात उदयास आले.या कारखान्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून आकारास आलेल्या या युवा नेतृत्वाने काँग्रेसचे प्रस्थापित जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंञी डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रदीर्घ राजकीय वर्चस्वाला जोरदार सुरुंग लावला.

Loading...

२९ डिसेंबर २००६ रोजी कारखानास्थळी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी तत्कालीन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह सभागृहात प्रवेश केला. संभाजीराव पाटील यांनी यावेळी शेतक-यांच्या संबंधीचे काही प्रश्न उपस्थित केले.दरम्यान यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर या काका-पुतण्यांमध्ये बाचाबाची झाली.त्यानंतर सभास्थळी दोन्ही निलंगेकर समर्थकांमध्ये मोठा गोंधळ सुरु झाला.दरम्यान संभाजीराव पाटील निलंगेकर सभेतून जात असताना गोंधळ वाढला.लोक कारखाना परिसरात सैरावैरा धावू लागले.या गोंधळादरम्यान काटेजवळगा येथील विश्वनाथ लांबोटे या शेतक-याचा मृत्यू झाला तर अनेक शेतकरी व पोलिस कर्मचारी यावेळी जखमी झाले होते.या गोंधळाच्या परिस्थितीला काबूत आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या होत्या.

या प्रकरणी तत्कालीन सपोनि. चतुर्भुज काकडे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,पं.स.सभापती अजित माने,माजी नगराध्यक्ष हमीद शेख,विनोद आर्य,ईश्वर पाटील,दगडू सोळूंके,सत्यवान धुमाळ,चंदर पाटील यांच्यासह २९ जणांविरुध्द निलंगा येथील पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पोलिसांनी निलंगा येथील न्यायालयात दोषारोपपञ दाखल केले होते.अतिरिक्त जिल्हा व सञ न्यायाधीश एम.एस.पठाण यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.विधी व न्याय विभागाचे संचालक,जिल्हाधिकारी,पोलिस विभागाच्या संयुक्त समितीने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवरील गुन्ह्याबाबत दिलेल्या अहवालानुसार न्यायालयाने कामगारमंञी संभाञीराव पाटील निलंगेकर यांच्यासह २९ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.अँड सी.जे सबनीस यांनी निलंगेकरांची बाजू मांडली.त्यांनी हेमंत गायकवाड,सुनिल माने,एम.के.वलांडे यांनी सहाय्य केले.

याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने अंबुलगा कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर यांच्याशी संपर्क साधला असता न्याय देवतेने दिलेल्या निर्णयाचा आपण आदर राखलाच पाहिजे.त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे आपण स्वागत करतो अशी प्रतिक्रिया अशोकराव पाटील यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?