२८ व्या वर्षीय तेजस्वी सूर्याने केली राजकारणात एन्ट्री, देशभरात जोरदार चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणुकीत भाजपने दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून एका तरुण उमेदवार रिंगणात उतरवला आहे. तेजस्वी सूर्या असे या तरुणाचे नाव असून केवळ २८ व्या वर्षीच भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी ही संधी दिली आहे. तेजस्वी सूर्या यांच्या उमेदवारी दिल्याने अनेक राजकीय नेत्यांना धक्का बसला आहे.

यावेळी तेजस्वी यांनी अद्याप विश्वास बसला नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा आपल्यावर विश्वास दाखवतील असे वाटले नव्हते असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान आतापर्यंत दक्षिण बंगळुरू मतदार संघाचे नेतृत्व भाजपाचे दिवंगत नेते अनंत कुमार करत होते मात्र त्यांच्या निधनानंतर या जागेवर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात येणार आहे अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र मतदार संघातील तरुण मतदारांची वाढती संख्या बघून भाजपने तेजस्वी सूर्या या २८ वर्षीय तरुणाची उमेदवारीसाठी निवड केली आहे.

Loading...

तेजस्वी सूर्या हे पेशाने वकील असून कर्नाटकमधील भाजपाचे उगवते नेतृत्व म्हणून यांच्याकडे पाहिले जात आहे. तर बंगळुरू दक्षिण मतदारसंघात तेजस्वी सूर्या यांचा सामना काँग्रेसचे दिग्गज नेते बी. के. हरिप्रसाद यांच्याशी होणार आहे.