288 आमदार हे बिनकामाचे -संभाजी भिडे

या राज्यकर्त्यांपैकी एकालाही प्रतापगडाच्या कुशीत महाराजांचे स्मारक व्हावे, असे का वाटत नाही?

सांगली: आतापर्यंत शिवरायांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केल्याचा आरोप करत प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचे स्मारक व्हावे यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करत नाही त्यामुळे राज्यातील 288 आमदार हे बिनकामाचे आहेत, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलं आहे. सांगलीतल्या तासगावात झालेल्या धारकऱ्यांच्या गडकोट मोहिमेच्या बैठकीत ते बोलत होते.

काय म्हणाले संभाजी भिडे गुरुजी ?

या राज्यकर्त्यांपैकी एकालाही प्रतापगडाच्या कुशीत महाराजांचे स्मारक व्हावे, असे का वाटत नाही? आजपर्यत शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीस्कर राजकारणानुसार केला. या लोकांना शिवरायांच्या विचारांशी, त्यांच्या कार्याशी देणे घेणे नाही. प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचे स्मारक व्हावे यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे राज्यातील 288 आमदार हे जवळसपास बिनकामाचे आहेत. खासदार संजय पाटील हे मराठा आहेत पण ते कधीच म्हणाले नाहीत, की शिवरायांचे स्मारक व्हावे, यासाठी मी उपोषणाला बसेन. शिवरायांच्या नावाचा वापर करुन राजकारण केले जात आहे. आपला देश दहशतवाद, आंतकवाद यामध्ये सापडलेला आहे. मात्र तो आतंकवाद संपवण्यासाठी शिवरायांनी घालून दिलेली शिकवण आज कोणीच अंमलात आणत नाही. राज्यात शिवरायांचे हजारो पुतळे उभे केले आहेत, हे राज्यकर्त्यांचे केवळ नाटक आहे.

You might also like
Comments
Loading...