नांदेड: नांदेड जिल्ह्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील प्राप्त झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, ज्वारी या जिरायती पिकांसह बागायती व फळ पिकांचे नुकसान झाले. ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसानेही मोठे नुकसान केले. अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या मदतीचे १६ तालुक्यांतील शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाने १६ तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करून, राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती. ५६५ कोटी रुपये मागणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा म्हणून पहिल्या टप्प्यात २८२ कोटी रुपये देण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यातील २८२ कोटी ५६ लाख रुपये सोमवारी प्राप्त झाले आहेत. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
दुसऱ्या टप्प्यात नांदेड (१० कोटी ३३ लाख रुपये), अर्धापूर (८ कोटी ५१ लाख), उमरी (१४ कोटी ३७ लाख), हदगाव (३२ कोटी ८१ लाख), हिमायतनगर (१५ कोटी ८९ लाख), कंधार (२० कोटी ७६ लाख), लोहा (२६ कोटी ३६ लाख), बिलोली (१६ कोटी २० लाख), नायगाव (१९ कोटी १९ लाख), देगलूर (२२ कोटी ४१ लाख), मुखेड (२४ कोटी ४० लाख), भोकर (१९ कोटी ५७ लाख), मुदखेड (७ कोटी ३९ लाख), धर्माबाद (१० कोटी २३ लाख), किनवट (२४ कोटी २३ लाख) व माहूर (९ कोटी ८३ लाख रुपये) निधी मिळणार आहे. या निधीमुळे शेतकऱ्यांना काहीप्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- हे पण आम्हीच केले…औरंगाबादमध्ये रंगली सेना- काँगेसमध्ये श्रेयवादाची लढाई
- कुठल्याही परिस्थितीत औरंगाबादचे संभाजीनगर होणारच; शिवसेनेच्या एकमेव मुस्लिम आमदाराचा एल्गार
- ‘गेंड्याच्या कातडीचे मंत्री व महाविकास आघाडीचे सरकार मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटत नाही’
- ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावे; भाजप नेत्याचा अजब सल्ला
- जाणून घ्या ग्रामपंचायत निवडणुकीला एवढे महत्व का?