Subsidy Scam Osmanabad- अनुदान घोटाळाप्रकरणी २८ जणांना फरार

माजी नगराध्यक्ष, तत्कालीन नगरसेवक तसंच अधिकाऱ्यांचा समावेश

तुळजाभवानी देवीच्या यात्रेसाठी सरकारकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जाते. या अनुदानामध्ये एक कोटी 62 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी विद्यामान नगराध्यक्ष अर्चना विनोद गंगणे, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे यांच्यासह 28 जणांच्या विरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या यात्रा अनुदान घोटाळाप्रकरणी २८ जणांना फरार घोषित करण्यात आलं आहे. यामध्ये माजी नगराध्यक्ष, तत्कालीन नगरसेवक तसंच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती उस्मानाबादचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
दरम्यान, तुळजाभवानी मंदिरात अति महत्वाच्या व्यक्ती- व्हीआयपी दर्शनासाठी शुल्क आकारलं जाणार आहे. अशा दर्शनासाठी प्रत्येकी १०० रुपये आकारण्यात येणार असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली. याशिवाय अभिषेक आणि सिंहासन पुजेतच्या दरातही वाढ करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

 

 

You might also like
Comments
Loading...