पुणे शहरात आज नव्याने २७६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

pune

पुणे : पुणे शहरात आज नव्याने २७६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८४ हजार ३५६ इतकी झाली आहे. शहरातील ३१० कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७२ हजार ८३९ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ७ हजार १७८ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २७ लाख ९९ हजार १८७ इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ८१५ रुग्णांपैकी २२९ रुग्ण गंभीर तर ३८९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७०२ इतकी झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणात महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम केला आहे. राज्यात चार कोटींचा टप्पा पार केला. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 24 हजार 701 लसींचे डोस देण्यात आले. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांची माहिती दिली.

 

महत्त्वाच्या बातम्या

IMP