मराठा आरक्षण जनसुनावणीत तब्बल 26 हजार निवेदने समितीपुढे सादर

maratha-morcha-2

पुणे- मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात शुक्रवारी पुण्यातील विधानभवन येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने जनसुनावणी घेतली. या जनसुनावणीमध्ये तब्बल 26 हजार निवेदने समितीपुढे काल सादर करण्यात आली. या जनसुनावणीत मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात व्यक्ती व संघटनांकडून निवेदने स्वीकारून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.

यामध्ये सामाजिक संघटना, ग्रामपंचायतीचे ठराव, वैयक्तिक निवेदनांचा समावेश आहे, अशी माहिती या जनसुनावणीला राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड, समितीचे सदस्य सर्जेराव निमसे, दत्तात्रय बाळसराफ, चंद्रशेखर देशपांडे, प्रमोद येवले, रोहिदास जाधव, सुधीर ठाकरे, सुवर्णा रावळ, भूषण कर्डिले तसेच सदस्य सचिव डी. डी. देशमुख,आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.

प्राप्त निवेदनांपैकी काही निवेदने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशा मागणीची होती. राज्यभरातून प्राप्त झालेल्या निवेदनांची संख्या मोठी असून, त्यावर आयोग अभ्यास करून मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीचा अहवाल शासनाला सादर करणार आहे.