26/11 चा हल्ला हा केवळ मुंबईवर नाही, तर…; फडणवीसांची प्रतिक्रिया

26/11 चा हल्ला हा केवळ मुंबईवर नाही, तर…; फडणवीसांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी (26-11 Mumbai terrorist attack) नागरिकांचे रक्षण करताना शहिद झालेल्या मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक तसेच अन्य सुरक्षा दलातील अधिकारी, जवानांच्या शौर्य व त्यागाचे स्मरण करत अनेकांनी आदरांजली वाहिली आहे. याच दिवशी पाकिस्तानातून (Pakistan) आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमवला. या मन हेलावणाऱ्या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण होत आहेत.

२६ नोव्हेंबर २००८ या घटनेच्या दिवशी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील ट्विट करत शहिदांना आदरांजली वाहिली आहे. सोबतच हिंदी भाषेत एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे. यात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 26/11 हा केवळ मुंबईवर नाही, भारतावर नाही, तर संपूर्ण मानवतेवर झालेला हल्ला असल्याचे म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणतात, ‘आजच्या दिवशी भ्याड आतंकवादी हल्ला झाला होता. जो सार्वभौमत्वावर हल्ला होता. या हल्ल्यादरम्यान मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणी टार्गेट करण्यात आले होते. ज्याच्या आधारे केवळ मुंबईलाच नाही तर संपूर्ण आंतराष्ट्रीय समाजाला पराजित करण्याचं लक्ष्य होतं. ज्या प्रकारे हा हल्ला झाला होता. तो कोणालाच विसरता येण्यासारखा नाही. २६-११ हल्ला हा नागरिकांनी संपूर्ण भारतावरील हल्ला मानला होता.

‘आंतराष्ट्रीय समाज देखील हेच मानतो, की हा हल्ला केवळ भारतातच नाही, तर परराष्ट्रात देखील अशाप्रकारे हल्ले होत आहेत. हा हल्ला मानवतेवर तसेच संपूर्ण आंतराष्ट्रीय समुदायावर होत आहे. आपल्या सर्वांना मिळून या विरोधात लढावं लागेल. माझा विश्वास आहे, की यामुळे मानवता जिंकेल, आणि आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नाही. याप्रसंगी या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलीस अधिकारी आणि जनतेला नमन करतो, असे म्हणत त्यांनी शहिदांना आदरांजली अर्पण केली.

महत्वाच्या बातम्या: