राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी शहीदांना वाहिली आदरांजली

जरा याद करो कुर्बानी ...

मुंबई:भारताच्या इतिहासातील काळा दिवस ठरलेल्या 26/11च्या हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. २६ नोव्हेबर २००८ ला मुंबईत १० पाकिस्तानी आतंकवाद्यांनी शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. मुंबई पोलिसांचे कर्तबगार अधिकारी विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे या हल्ल्यात शहीद झाले होते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस जिमखाना येथील स्मृती स्थळावर आदरांजली वाहिली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार राज पुरोहित, भाई जगताप, मुख्य सचिव सुमित मलिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, शहीद अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय, वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी तसेच शहीद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी स्मृती स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमानंतर राज्यपाल व मुख्यमंत्री महोदयांनी शहीद कुटुंबीय आणि उपस्थित अधिकारी यांच्याशी संवाद साधला. तसेच यावेळी उपस्थित फोर्स वन च्या कमांडोजची पाहणी करून माहिती घेतली.

You might also like
Comments
Loading...