‘..हा हल्ला मुंबईच्या नव्हे तर देशाच्या काळजावर झाला’, अदिती तटकरेंची प्रतिक्रिया

‘..हा हल्ला मुंबईच्या नव्हे तर देशाच्या काळजावर झाला’, अदिती तटकरेंची प्रतिक्रिया

Aditi Tatkare

मुंबई: मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी (26-11 Mumbai terrorist attack) नागरिकांचे रक्षण करताना शहिद झालेल्या मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक तसेच अन्य सुरक्षा दलातील अधिकारी, जवानांच्या शौर्य व त्यागाचे स्मरण करत अनेकांनी आदरांजली वाहिली आहे. याच दिवशी पाकिस्तानातून (Pakistan) आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमवला. या मन हेलावणाऱ्या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण होत आहेत.

आजच्या या घटनेदिवशी काँग्रेस नेत्या अदिती तटकरे (Congress leader Aditi Tatkare)यांनी देखील ट्विट करत शहिदांना आदरांजली वाहिली आहे. मुंबईच्या नव्हे तर देशाच्या काळजावर २६/११/२००८ रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे जवान, मुंबई पोलिस व निष्पाप नागरीक यांचे स्मरण करूया. भावपूर्ण श्रध्दांजली. असे ट्वीट अदिती तटकरे यांनी केले आहे.

दरम्यान यावरच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Women and Child Welfare Minister Yashomati Thakur)यांनी देखील ट्विट करत शहिदांना आदरांजली वाहिली आहे. भारतावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला परतवून लावणाऱ्या आणि नव्या उमेदीने पुन्हा एकदा ताकदीने उभ्या राहणाऱ्या मुंबईकरांना आणि भारतीयांना सलाम. नागरिकांचे आणि मायभूमीचे रक्षण करताना या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस बांधवांना आणि नागरिकांना विनम्र श्रद्धांजली. असे ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या: