बिहारमधील पुरात २५३ जणांचा मृत्यू; मदतकार्य युद्धपातळीवर सुरु

पाटणा : बिहारमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत तब्बल २५३ जणांचा मृत्यू झाला. तर, १८ जिल्ह्यातील एक कोटी २६ लाख ८७ हजार लोकांना या पुराचा फटका बसला आहे.राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या २८ तुकड्या, राज्य आपत्ती निवारण दलाच्या १६ तुकड्या आणि लष्कराच्या जवानाचे मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ७ लाख २१ हजार ७०४ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर, पूरग्रस्तांच्या सोयीसाठी १ हजार २८९ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून ४ लाख २१ हजार ८२४ लोकांनी आसरा घेतला आहे.बिहारप्रमाणे उत्तर प्रदेश आणि आसामला पुराचा फटका बसला आहे. आसाममध्ये आलेल्या पुरात 88 लोकांना मृत्यू झाला आहे. तर, जिल्ह्यातील सुमारे १९ लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे.

You might also like
Comments
Loading...