राज्यातील ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी 250 कोटीचा निधी,पंकजा मुंडेंची घोषणा

चाकूर :- राज्यातील ज्या ग्रामपंचायतीना स्वत:च्या इमारती नाहीत अथवा इमारती जीर्ण झाल्या आहेत, अशा सर्व ग्रामपंचातींना ग्राम विकास विभागाकडून नवीन इमारत बांधण्यासाठी 250 कोटीचा निधी मंजूर केला असून या माध्यमातून गाव विकासाच्या कामाला अधिक गती मिळणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी चाकूर येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी अध्यक्षस्थानी कामगार कल्याण ,कौशल्य विकास, भूकंप पूर्नवसन, व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर उपस्थित होते. तसेच आमदार सुधाकरराव भालेराव , जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. निला यांच्यासह इतर मान्यवर ,महिला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Loading...

मा.श्री आमदार विनायकराव जाधव-पाटील बोलताना म्हणाले ताईने आणि भैय्या यांनी आपल्या मतदारसंघावर इतके प्रेम केले आहेत कि माझाकडे शब्द अपूरे पडत आहेत त्याचे आभार व्याक्त करायला. मुंडे साहेबांच्या नंतर ताईच्या नेतृत्वांने महाराष्ट्रला मुंडे साहेबांनाची कमी भासू दिली नाही. राष्ट्रवादीच्या काळीतील रस्ते ,पुल, सभागृह इ.हे एक वर्ष पण टिकले नाहीत त्यांना म्हटले . मागच्या काळातील लोकापेक्षा इंग्रज बरे असे म्हणायची वेळ आली आहे असे त्यांनी सांगितले. ज्या दिवशी देशात नरेंद्रजी आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी आले त्या दिवशी खऱ्या आर्थाने देश स्वातंत्र्य झाला. आमदार साहेबांनी या कार्यक्रमासाठी ताई आणि भैय्याजी उपस्थित झाले या कार्यक्रमाला चार चांद लागले असे ते म्हणाले .

आमदार साहेबांनी अहमदपुर च्या पंचायत समितीसाठी नविन इमारत व मतदारसंघातील उर्वरीत रस्ताची मंजुर करावेत असी विनंती पंकजाताई कडे केली.

जलयुक्त शिवार अभियान, पीक विमा,धान्य खरेदी केंद्र आदि शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी सांगून पंडित दीनदयाल उपाध्याय, बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी या मान्यवर व्यक्तींच्या नावानी विविध लोककल्याणकारी योजना शासनाकडून राबविल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले. त्याप्रमाणेच महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ देऊन बचत गटांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचं ही त्यांनी सांगितले.

शासनाने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध उपाय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन मुलींचा घसरलेला जन्मदरात वाढ केली आहे. हे शासन फक्त इमारती, रस्ते या विकास कामांबरोबरच सामाजीक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्रीमती मुंडे यांनी सांगितले. लातूर जिल्हयातील सर्व महसूल मंडळे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेली असून जिल्हयात सर्वत्र दुष्काळाच्या उपाययोजना लागू झाल्या आहेत. परंतु लातूर जिल्हा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री निलंगेकर यांनी केले. त्याप्रमाणेच चाकूर ते गुलबर्गा व नांदेड ते लातूर हे रेल्वेमार्गाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याची माहिती त्यांनी दिल.

प्रारंभी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते अहमदपूर चाकूर तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 216 कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी 121 कोटी रुपयांच्या तर मुलभूत सुविधा योजनेंतर्गत साडे पाच कोटीच्या विकास कामांचे ई-लोकार्पण व भूमीपूजन व्यासपीठावरुन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघराज बाहेती यांनी केले तर आभार सुधाकरराव श्रृंगारे यांनी मानले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार