टीम महाराष्ट्र देशा – कर्जत नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड देत शिवसेनेने आपला भगवा फडकला आहे. कर्जत नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षासह शिवसेना-भाजप-रिपाइ यांच्या 10 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या सुवर्णा जोशी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.
Loading...
कर्जत नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांच्या राजकीय गणितांना शिवसेनेने धक्का दिला आहे. ब्बल 25 वर्षांनी कर्जत नगरपालिकेत परिवर्तन झाले आहे. यामध्ये शिवसेनेने हे परिवर्तन घडवून आणले आहे. शिवसेनेने येथे 6 जागांवर विजय मिळवला तर भाजपने 4 जागांवर यश मिळवले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा जिंकल्या आहेत.
1 Comment