25 वर्ष टोलवाटोलवी केली, पण आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण ? खा. उदयनराजे

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे आह साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. 25 वर्ष टोलवाटोलवी केली, पण आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत सरकारला चांगलच झापलं आहे. जी तत्परता अॅट्रॉसिटी कायद्याबाबत दाखवली, तिच तत्परात मराठा आरक्षणाबाबत का नाही? सर्वांची संमती आहे तर मग मराठा आरक्षणाला विलंब का? असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला .
खा. उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे :
– मराठा आरक्षण परिषद घेऊन सगळ्यांची मतं घेऊ, त्यामध्ये होणाऱ्या निर्णयाशी मी बांधिल असेन : उदयनराजे भोसले.
– दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्या, असं म्हणत नाही : उदयनराजे भोसले 
पुढची 30 वर्ष मराठा आरक्षण मिळणार नाही, अशी घोषणा तरी करुन टाका,  उदयनराजे भोसलेंचा उपहासात्मक टोला.
– सरकारने मराठा आंदोलकांवरील केस तातडीने मागे घ्याव्यात, अन्यथा त्याचा भडका होईल, परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही : उदयनराजे भोसले.  
– आंदोलन करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना मिळतं काय? दरोडा, खुनाच्या केसेस  : उदयनराजे भोसले. 
– मराठा मोर्चे थांबले पाहिजेच म्हणता, मग मार्ग का काढत नाही? लोकांसमोर पर्याय नसल्यानेच आजचे मोर्चे : उदयनराजे भोसले.
– ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्याची जाणीव प्रत्येक प्रतिनिधींना असायला हवी : उदयनराजे भोसले. 
-मराठा समाजावर आज जी वेळ आली आहे, त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वेळीच प्रश्न मार्गी लागले असते तर अनेकांची जीव गेले नसते : उदयनराजे भोसले.
-मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला कोणत्याही अन्य मुद्द्याशी जोडू नका, ना राजकारण, ना अन्य समाजाशी तुलना नको : उदयनराजे भोसले. 
-मराठ्यांचे 58 मूक मोर्चे निघाले, जगभरातील मीडियाने दखल घेतली, मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यावेळीच हाताळला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती : उदयनराजे भोसले. 

 

शरद पवारांनी शक्य असूनही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही : विनायक मेटे

You might also like
Comments
Loading...