औरंगाबादेत ‘कचराबाणी’ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 25 ते 30 जण जखमी, 5 गंभीर

एकाचा मृत्यू झाल्याची शक्यता

अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार) औरंगाबाद : श्रीलंकेत आणीबाणी अन् औरंगाबादेत ‘कचराबाणी’ निर्माण झाली आहे. आज मिटमीट्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 25 ते 30 जण जखमी झाले. त्यात 5 जण गंभीर जखमी झाले. त्यात एकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Clash On Garbage Dumping Yard Issue At Aurangabad
वास्तविक, आज या विषयावर तोडगा काढण्यासाठी विशेष सभा बोलावली होती. या सभेला औरंगाबाद महानगर पालिकेच्या परंपरेनुसार कागदोपत्री ‘कोरम’ पुर्ण होता. पण दुपारनंतर  30 ते 35 नगरसेवक ‘फिजीकली’ हजर होते. एवढ्या महत्वाच्या विषयावर विशेष सभा असतांनाचे  सदस्यांची ही परिस्थिती होती. त्यामुळे ज्यांचा मुद्दा कचऱ्यामुळे अडकला आहे, तेच उपस्थित होते.

ज्या वाॅर्डात कचरा टाकण्याला जे विरोध होतो आहे. त्याची कारणे शोधण्याची गरज आहे. दस्तुरखुद्द महापौरांना त्यांच्या वाॅर्डात कचरा टाकण्याला विरोध आहे. याचे कारण ‘जमीनी’त आहे. तिच परिस्थिती पडेगाव, मिटमीट्यात आहे. प्रत्येकाचे आप-आपल्या वाॅर्डात एक ‘जमीनींचे एम्पायर’ निर्माण केले आहे. त्यासाठीच काहीजण नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. म्हणून जिथे राजकारण्यांची जमीन नाही असा भूभाग औरंगाबाद शहराच्या परिसरात शिल्लक नाही.म्हणून औरंगाबादेत ‘कचराबाणी’ निर्माण झाली आहे. त्यामुळे कचरा टाकायला महानगर पालिकेचे कर्मचारी कुठे जाणार, याची माहिती त्या-त्या ठिकाणच्या लोकांना मिळते, मग तिच माहिती प्रसार माध्यमांपर्यत जाते. मग नगरसेवकांच्या ‘स्व-स्वार्थाचा’ ‘पब्लिक इश्यू’ होतो. अशाच पद्धतीने औरंगाबादेतील ‘कचराबाणी’चा चेंडू टोलवला जातो आहे. तोडगा काढण्याला या नगरसेवकांची किती इच्छाशक्ती आहे, हे आजच्या विशेष सभेतील उपस्थितीने दाखवून दिले आहे.

bagdure

Clash On Garbage Dumping Yard Issue At Aurangabad

You might also like
Comments
Loading...