पिंपरी चिंचवड मध्ये मराठा क्रांती मोर्चाचे 25 ते 30 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

टीम महाराष्ट्र देशा : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. यात पिंपरी चिंचवडमध्ये मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरीमध्ये क्रांतीवीर चाफेकर राष्ट्रीय संग्राहलायच्या इमारतीचं भूमिपूजन करणार आहेत. कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांचा महापूजेला न जाण्याचा निर्णय

दरम्यान ,मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चेकऱ्यांनी मराठवाड्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन दिलं. बीड जिल्ह्यातील परळीत 18 जुलैपासून या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर जागेवरुन हलणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापूजा करु देणार नाही, असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाने त्यावेळी दिला होता.

मराठा आरक्षण : संतप्त आंदोलकांनी सहकार मंत्र्याची गाडी अडवली 

मराठा आरक्षण : आंदोलक व वारकरी ओळखण्यात पोलिसांना अडचण