fbpx

महाराष्ट्रातील २५ रुसा प्रकल्पांचे रविवारी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल लाँचिंग

indian-pm-narendra-modi

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० (रुसा) या कार्यक्रमांतर्गत रविवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४५ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील २५ रुसा अंतर्गत प्रकल्पांच्या डिजिटल लाँचिंगचा कार्यक्रम होणार आहे. मुंबईत चर्चगेट येथील सेंट झेवियर्स येथे होणाऱ्या २ रुसा प्रकल्पांच्या डिजिटल लाँचिगच्या कार्यक्रमप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

रुसा अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील चिखली येथील नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजचा कोनशिला अनावरण समारंभ त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजचा अनावरण समारंभ डिजिटल लाँचिंगच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे रुसा अंतर्गत महाराष्ट्राला स्वायतत्ता मिळालेल्या खालील महाविद्यालयांचे डिजिटल लाँचिग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डिजिटल लाँचिंगचा कार्यक्रम होणार आहे. रुसाच्या ज्या २२ महाविद्यालयांना स्वायत्तता मिळाली आहे, त्या महाविद्यालयांमध्ये जय हिंद कॉलेज, मुंबई, सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई, रामनरीन रुईया कॉलेज मुंबई, मिठीबाई कॉलेज ऑफ आर्टस,चौहान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ए जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स मुंबई, डॉ. भानूबेन महेंद्र नानावटी ऑफ होम सायन्स मुंबई, हंसराज जीवनदास कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई, एसआयईएस कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स मुंबई, सोफीया कॉलेज ऑफ वूमन मुंबई, चिकित्सक समूहास सन सीताराम ॲण्ड लेडी शांताबाई पाटकर कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायन्स ॲण्ड व्ही पी वर्दे कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स मुंबई, गुरु नानक खालसा कॉलेज ऑफ आर्टस सायन्स ॲण्ड कॉमर्स मुंबई, बी. के. बिर्ला कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स, ठाणे, रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, रायगड, चांगू काना ठाकूर आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स, रायगड,सिमबॉयसेस कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉमर्स, सेनापती बापट, पुणे, सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, पुणे, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा, तुलजाराम चतुरचंद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स बारामती, पुणे, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा,सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड, सातारा, धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय,पंढरपूर, सोलापूर,छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, कोल्हापूर या महाविद्यालयांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील प्रकल्पाचे डिजिटल लाँचिंग होणार आहे.

शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी महाविद्यालयांना जागतिकीकरणाच्या वेगाबरोबर रोजगाराभिमुख नवनवीन अभ्यासक्रम संशोधन व विकास व नवोपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्तता देण्याचे शासनाचे धोरण आहे. सदर संकल्पनेचा पुढील टप्पा म्हणून स्वायत्तता प्रदान केलेल्या महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्तता योग्य प्रकारे अंमलात आणण्यासाठी भौतिक संरचना व पायाभूत सुविधांकरिता राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात येते.