fbpx

भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे २५ मुस्लिम कुटुंबांना टाकल वाळीत; मशिदमध्ये नमाज पढण्यास बंदी

namaz muslim

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे त्रिपुरामधील मुस्लिमांना स्थानिक मशिदमध्ये नमाज पढण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्रिपुरामधील मोईदातिला या गावात ८३ कुटुंब मुस्लिमांची आहेत. यापैकी २५ कुटुंबांनी येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे स्थानिक मशिदीनं त्यांना वाळित टाकलं आहे. जनसत्ता ऑनलाइननं दिलेल्या वृत्तानुसार वाळीत टाकलेल्या मुस्लीमांना वेगळी मशिद बांधली आहे.

२५ कुटुंबांनी भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा स्पष्ट केलं आहे. त्यांना अन्य मुस्लीमांनी वेगली वागणूक दिली असून त्यांना गावातील मशिदीत नमाज पढण्यास मनाई करण्यात आली. या कुटुंबांनी १६ महिन्यांपुर्वी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. हिंदुत्ववादी पक्षाला समर्थन द्याल तोपर्यंत इथं नमाज पढता येणार नाही असं त्यांना सांगण्यात आलं आहे. त्रिपुरामध्ये आगामी काळात निवडणुका होणार असून भाजपा सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहे. भाजपावर केवळ हिंदुत्ववादी असल्याचेच नाही तर मुस्लीमविरोधी असल्याचे आरोपही होत आहेत. त्रिपुरामध्ये दोन दशकांहून अधिक काळ डाव्यांचं सरकार आहे. हे सरकार उलथवण्यासाठी भाजपा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करेल असे आरोपही विरोधकांनी केले आहेत.