घाटीत २५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

ratnagiri

औरंगाबाद : घाटीत गेल्या चोवीस तासात २५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ४२ रुग्णांना शुक्रवारी सुटी देण्यात आली. घाटीत सध्या उपचार घेत असलेल्या ४६३ रुग्णांची प्रकृती गंभीर, तर १३८ रुग्ण स्थिर आहे. आतापर्यंत एक हजार ६५४ मृत्यू, तर सात हजार ३५३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

घाटीत गेल्या चोवीस तासात २५ बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये सिल्लोड, शिवना येथील ५० वर्षीय पुरूषाचा १४ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास, एसटी कॉलनीतील ६५ वर्षीय वृध्देचा गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास, हिंगोली, रामनगरातील ३४ वर्षीय तरुणाचा सकाळी अकराच्या सुमारास, सिल्लोड येथील ४५ वर्षीय महिलेचा सकाळी साडेअकराच्या सुमारास, जळगाव, पाचोरा येथील २५ वर्षीय महिलेचा सकाळी साडेसातच्या सुमारास

गारखेडा येथील ६४ वर्षीय वृध्देचा दुपारी दोनच्या सुमारास, सोयगावातील हनुमान खेडा येथील ६० वर्षीय वृध्देचा सकाळी अकराच्या सुमारास, फुलंब्री, बाजार गल्लीतील ७० वर्षीय वृध्देचा दुपारी दीडच्या सुमारास, संजयनगर भागातील ६५ वर्षीय वृध्देचा सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास, गंगापुरातील ६० वर्षीय वृध्देचा सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास, सुधाकरनगरातील ५६ वर्षीय वृध्देचा सायंकाळी सातच्या सुमारास, वैजापुर, भादली येथील ८० वर्षीय वृध्देचा सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास,

परभणी, रहीमनगरातील ६० वृध्दाचा रात्री आठच्या सुमारास, सिडको, एन-६, संभाजी कॉलनीतील ६५ वर्षीय वृध्देचा दुपारी साडेबाराच्या सुमारास, सिल्लोड ४५ वर्षीय पुरूषाचा मध्यरात्री दोनच्या सुमारास, कन्नड, अजिंठा येथील ८० वर्षीय वृध्देचा सायंकाळी पाचच्या सुमारास, जयसिंगपुरा येथील ७२ वर्षीय वृध्देचा शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास, माळीवाडा येथील ६९ वर्षीय वृध्दाचा मध्यरात्री दीडच्या सुमारास, पैठण, गेवराई वाशी येथील ५५ वर्षीय वृध्दाचा सकाळी सातच्या सुमारास,

गंगापुर, मुदेश वडगावातील ६५ वर्षीय वृध्दाचा सकाळी पावणेसातच्या सुमारास, सिल्लोड, पानवडोद येथील ६५ वर्षीय वृध्दाचा रात्री पावणेअकराच्या सुमारास, जालना, जाफ्राबाद येथील ५५ वर्षीय वृध्दाचा मध्यरात्री दोनच्या सुमारास, पडेगावातील ७७ वर्षीय वृध्दाचा रात्री नऊच्या सुमारास, वडगाव कोल्हाटी येथील ६८ वर्षीय वृध्देचा रात्री नऊच्या सुमारास तर जाफ्राबाद, चापनेर येथील ८० वर्षीय वृध्दाचा सकाळी सव्वाआठच्या सुमारास मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या