बोंड अळी, ओखी वादळ नुकसानग्रस्तांसाठी केंद्राकडे 2425 कोटींची मागणी – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात कापसावरील बोंड अळी, धानावरील तुडतुडे व ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. यातील नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे मदतीसाठी पत्र दिले असून त्याद्वारे 2 हजार 425 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. याबाबत श्री. पाटील म्हणाले, राज्यात कापसावर बोंडअळी तसेच धानावर तुडतुडे अळी त्याचप्रमाणे समुद्रातील ओखी वादळामुळेही किनारपट्टी भागातील पिक व फळ बागांचे नुकसान झाले होते. या सर्व घटनांचे पंचनामे करण्यात येत आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. ही मदत तातडीने मिळण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत.