पुढचे २४ तास महत्वाचे, खोट्या एक्झिट पोल च्या प्रचारावर नाराज होऊ नका ; राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. पुढचे २४ तास खूप महत्वाचे आहेत. खोट्या एक्झिट पोल च्या प्रचारावर नाराज होऊ नका. अशा आशयाचा ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

संपूर्ण देशाला २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. आवघ्या काही तासांमध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सर्वांनाच देशात कोण सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता लागलेली आहे. याचदरम्यान प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या एक्झिट पोल नुसार देशात एनडीए सरासरी २७० ते २९० जागा मिळवणार तर कॉंग्रेस सरासरी ११० ते १३० जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात महायुती सरासरी ३० ते ४० जागा तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरासरी ७ ते १२ जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्विट करत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या प्रिय कार्यकर्त्यांनो, पुढचे २४ तास खूप महत्वाचे आहेत. सतर्क आणि सावध राहा. तुम्ही सत्या साठी लढत आहात. खोट्या एक्झिट पोलच्या प्रचारामुळे नाराज होऊ नका. स्वतःवर आणि कॉंग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. तुमची मेहनत वाया जाणार नाही. असे राहुल गांधी यांनी म्हंटले.