प्रेमप्रकरणातून २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

https://maharashtradesha.com/23-year-old-boy-suicide-at-dr-babasaheb-aambedkar-marathvada-university-hostel/

औरंगाबाद: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागात शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय गणेश कोपरवाड या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृहाच्या खोली क्रं 98 मध्ये गणेशने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गणेश शंकरराव कोपरवाड हा मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागात तो शिकत असून विद्यापीठातील छत्रपती शिवाजी वस्तीगृहाच्या खोली क्रमांक 98 मध्ये त्याचा लहान भावासह राहत होता. आज सकाळी त्याने त्याच्या लहान भाउ आणि मित्रा सोबत जेवण केले त्यानंतर भाऊ आणि वसतिगृहातील इतर मुले ही विभागात लेक्चरसाठी गेली मात्र गणेश गेला नाही तो रुमवरच थांबला होता. विभागातील लेक्चर झाल्यानंतर जेवण करण्यासाठी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जेंव्हा लहान भाऊ वसतिगृहाच्या खोलीत आला तेंव्हा त्याने दार उघडलं असता गणे ने चादरी च्या सहायाने गळफास घेतल्याचे दिसून आले.

दरम्यान गणेशच्या खोलीत पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली असून त्या सुसाईड नोट वरून गणेश ने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याच स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याआधी एक विद्यार्थाने प्रेमप्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला महिनाही उलटला नसताना आज पुन्हा गनेशने त्याच वसतिगृहात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे