२३ नगरसेवक, ५ जिल्हा परिषद सदस्य जाणार राणेंच्या वाटेवर!

सोलापूर  : शहर आणि जिल्ह्यातून २३ विद्यमान नगरसेवक आणि ५ जिल्हापरिषद सदस्य भाजपमध्ये जाणार असल्याचा अंदाज राणे समर्थकांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर राणेंसोबत मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश करणारा सोलापूर जिल्हा असेल असे मत राणे समर्थक महेश सावंत यांनी व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला सगळीकडे उधाण आलेले असताना सोलापुरातील राणे समर्थकांनी जिल्ह्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळेल असे संकेत दिलेत. नारायण राणे यांची कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेली आहे. याचमुळे त्यांच्यासोबत मोठ्या संखेने कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आले होते. तेथे होणारी कुचंबणा विचारात घेता आता भाजपमध्ये जाण्यास उत्सुक असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर राणेंसोबत मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश करणारा सोलापूर जिल्हा असेल, असे मत राणे समर्थक महेश सावंत यांनी व्यक्त केले आहे.

You might also like
Comments
Loading...