अकोला जिल्ह्यात पुनर्वसित आठ गावातील २२८ जणांचा मृत्यू

प्रशासन हादरले

 

सचिन मुर्तडकर(जि.आकोला) – मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोला जिल्ह्याच्या अकोट व तेल्हारा तालुक्यात पुनर्वसित झालेल्या आठ गावांत सुविधांअभावी मृत्यूचे तांडव सुरू असून , जिल्हा व स्थानिक प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. या भागातील वातावरण मानवत नसल्याने पाच वर्षात २२८ आदीवासी गावकरीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . या सर्व प्रकारामुळे आदिवासी संतापले असून त्यांनी पुन्हा मेळघाटात परत जाण्याचा निश्चय केला आहे.

नुकतीच  या गावात अमरावती आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक पाण्डेय, उपवनसंरक्षक लाकरा, सीईओ एस. राममुतीॅ, एसडीओ राजपुत,तहसिलदार घुगेसह सर्वच विभागाचे 40-50 अधिकारी-कर्मचारी गुल्लरघाट, सोमठाणा खुर्द, सोमठाणा बु., या गावांना भेट दिली . अधिकाऱ्यांनी समस्या ऐकुण घेत,ग्रामसभा घेऊन पुनर्वसनात लाभाथीॅ ,यांना मिळालेला लाभ,आक्षेप तसेच समस्याचा व्हीडीओ पुरावे घेण्याचे आदेश दिले आहेत.