एक कोहली, २२ विश्वविक्रम !

कोलंबो – आज येथे श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना विराट कोहलीने ८२ धावांची खणखणीत खेळी केली. विराटच्या या खेळीमुळे भारताने एकमेव टी२० सामन्यातही श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. याबरोबर विराटनेही असंख्य विक्रम केले.

Loading...

-आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ मालिकावीर पुरस्कार, दुसऱ्या क्रमांकावर ४ पुरस्कारांसह शेन वॉटसन

– धावांचा पाठलाग करताना कोहलीची कसोटी (६१.४१), वनडे (६७.१०) आणि टी२० (८४.६६ )अशी सरासरी

– आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १७ अर्धशतके

– आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक १०१६ धावा.

-आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५३.८२ अशी सर्वोच्च सरासरी

– आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना ८४.६६ ची सरासरी

-आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना ११७.०० ची सरासरी

– आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरा. मॅक्कुलम (२१४०), दिलशान(१८८९) आणि विराट (१८३०)

-श्रीलंकेविरुद्ध ४ टी२० सामन्यात ४ अर्धशतके

– विराटचा हा ५०वा टी२० सामना,५० सामन्यांत १७ अर्धशतके तर केवळ ६वेळा एकेरी धावसंख्येवर बाद

-भारतीय कर्णधाराकडून टी२० मध्ये केवळ दुसऱ्यांदा शतकी खेळी. यापूर्वी रैनाने झिम्बाब्वेविरुद्ध २०१० साली नाबाद ७२ धावांची खेळी

– भारतीय कर्णधाराकडून टी२० मध्ये ८२ धावांची सर्वोच्च खेळी

– ५०व्या टी२० सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा कोहली ४था खेळाडू. यापूर्वी दिलशान, मॉर्गन आणि आफ्रिदी यांच्याकडून ही कामगिरी

-५०व्या टी२० सामन्यात ८० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू

– आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,०००धावा करण्यासाठी सर्वात कमी अर्थात ३३३डाव, अमला (३३६), व्हिव्हियन रिचर्ड्स (३४४)

–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा ३३वा खेळाडू

-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा ७वा भारतीय खेळाडू, यापूर्वी सचिन, गांगुली, द्रविड, धोनी, सेहवाग आणि अझरुद्दीन यांच्याकडून ही कामगिरी

– सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये केवळ डिव्हिलिअर्स(१८९९६), गेल(१७९७२), अमला(१६५३७), धोनी(१५७४५) यांच्याकडून ही कामगिरी

-कोहलीच्या १५,०७५ धावांपैकी ८५८७ धावा वनडेमधून, १८३० धावा टी२० तर ४६५८ धावा कसोटी क्रिकेटमधून आल्या आहेत .

-१५,००० धावा ५०च्या सरासरीने करणारा कोहली हा जगातील एकमेव खेळाडू. कोहलीची सरासरी ५३.४५ अशी असून दुसऱ्या क्रमांकावरील कॅलिसची सरासरी ४९.१० आहे.

-शेवटच्या धावांचा पाठलाग केलेल्या १० सामन्यात कोहलीच्या ९९.६६च्या सरासरीने ५९८ धावा

– टी२० क्रिकेटमध्ये ६व्यांदा ७५ किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...