एलफिन्स्टन स्टेशनवरील ब्रिजवर चेंगराचेंगरीत २२ ठार; नेमक काय घडल ब्रिजवर वाचा सविस्तर

एलफिन्स्टन ते परेलला जोडणाऱ्या ब्रिजवर अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २२ जणांपेक्षा जास्त जणांना आपला जिव गमवावा लागला आहे. या ठिकाणी अतिशय विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे. आधी हि दुर्घटना शॉर्ट सर्किट आणि ब्रिज कोसळल्याच्या अफवेन झाल्याच सांगितल गेल. मात्र या ठिकाणी घडल काही वेगळच आहे,

आज सकाळी ९.३० च्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाला. त्यामुळे पावसापासून बचावासाठी परळ आणि एलफिन्स्टनला जोडणाऱ्या ब्रिजवर अनेक प्रवासी थांबले होते . तेवढ्यातच परळ आणि एलफिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी गाड्या आल्या. त्यातच ब्रिजवर आधीच उभे असलेले लोक पाऊस पडत असल्याने न उतरल्याने ब्रिजवर मोठी गर्दी झाली.यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला आणि सर्वांनी पुलावरुन उतरण्याचा प्रयत्न सुरु केला.

Loading...

यातच ढकलाढकली सुरु झाल्याने काही महिला आणि इतर प्रवासी खाली पडले. त्यांना अडकून आणखी काही प्रवासी ब्रिजवर पडले त्यांच्या अंगावरून लोकं गेल्याने ही चेंगराचेंगरी झाली.दुर्दैवाने ब्रिजबाहेर निघण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने ब्रिजच्या बाजूला लावलेले पत्रे फोडून लोकांना बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता

काही क्षणातच हे सगळ घडून गेलं आणि या चेंगराचेंगरीने २२ पेक्षा अधिक जणांचा बळी घेतला,अनेकांच्या हाता-पायाला मुका मार लागला ,शेकडो प्रवासी जखमी झाले हृदय पिळवटून टाकणाऱ्या आरडाआोरडीने ब्रिजशेजारी असलेल्या रेल्वे वसाहतीत राहणारे नागरिक बाहेर आले. त्यांना जे दृश्य समोर दिसलं ते अत्यंत भयानक होतं. या रहिवाशांनी देखील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

मृतांमध्ये 18 पुरुष, तर चार महिलांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेत सुमारे 36 जण जखमी असून त्यांच्यावर परळमधील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.अग्निशमन दलाचे जवान, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली .सध्या वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा ब्रिज तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत केली जाणार असून जखमींचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासन करणार असल्याचे सांगितले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
महिला उपजिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली