राज्य सरकारकडून जीएसटीमध्ये होणार २२ सुधारणा

gst

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय वस्तू व सेवा कर तसेच राज्य वस्तू व सेवा कर म्हणजेच CGST आणि SGST यांची दुहेरी आकरणी राज्यांतर्गत व्यवहारात होतात. यामध्ये एकाच व्यवहारावर दोन्ही कर आकारल्या जात असल्यामुळे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१९मध्ये २२ सुधरणा करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

१ ऑगस्ट २०१९रोजी केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमांमध्ये सुधारण्या झाल्या होत्या. केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा २०१७, व एकत्रीत वस्तू व सेवा कर २०१७ यामध्ये सुधारणा करण्यात आल्यात आहेत. तर महाराष्ट्र राज्याने राज्य वस्तू व सेवा कर म्हणजे SGST मध्ये सुधरणा करणे आवश्यक होते. जेणेकरून दोन्ही कायद्यामध्ये एकवाक्यात येऊ शकते. करदात्यासाठी आपसमेळ योजना, राष्ट्रीय आगाऊ अधिनिर्णय अपील प्राधिकरण स्थापना करणे, करदात्यासाठी सुलभ प्रक्रीया आणि अडचणींची सोडवणूक करणे अशा सुधारणा अधिनियमामध्ये आहे.

वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी दर टप्प्यांमध्ये कोणतेही बदल होणार नाही, असे स्पष्ट करतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या कराची मात्रा वाढविली जाऊ शकते, असे शुक्रवारी येथे सुस्पष्टपणे सूचित केले.

 

महत्वाच्या बातम्या