जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीसाठी २१४ अर्ज; सत्तार यांच्या अर्जावर सुचक म्हणून नितिन पाटील

Zilha madhywarti bank

औरंगाबाद : जिल्ह्यातील होणारी यंदाची जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही चांगलीच चुरशीची ठरणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या इतिहासात प्रथमच २१४ उमेदवारी अर्ज आले आहेत. आजपर्यंतचा इतिहास पाहता जिल्हा बँकेवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. पण यंदा हे चित्र बदलेल अशी चर्चा सगळीकडे आहे.

भाजपला जिल्हा बँकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वात निवडणूक एकत्र लढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार जिल्हा बँकेची निवडणूक एकत्र लढवणार असे आमदार अंबादास दानवे व माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी १७ फेब्रुवारीला जाहीर केले होते. शेवटच्या दिवशी सोमवारी प्रत्यक्षात याउलट परिस्थिती दिसून आली. भाजपमध्ये गेलेले बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी सुचक म्हणून कॅबीनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अर्जावर सही केल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे शिवसेना नेते आणि भाजपचे नेत्यांची वेगळीच रणनिती सुरु असल्याचे दिसून येत आहे. शेवटच्या दिवळी भाजपच्या युवा मोर्चाचे राज्य कोषाध्यक्ष अॅड. अभिषेक जैस्वाल, अॅड. देवयानी यांच्यासह तब्बल १६९ जणांनी अर्ज भरले.

यावेळी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘संचालक मंडळांची बिनविरोध निवड जर झाली तर खूप फायदा होईल. मात्र, निवडणूक झाली तर किमान १० कोटी रुपये खर्च होतील आणि कोण संचालक होईल अन् कोण घरी बसेल हे सांगता येत नाही.’ सोमवारपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २०५ अर्ज प्राप्त झाले. एका जागेसाठी सरासरी १० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मंगळवारी अर्जांची छाननी होईल व बुधवारी नामनिर्देशनपत्रांची सूची प्रसिद्ध केली जाणार आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

महत्वाच्या बातम्या