मुख्यमंत्र्यांना पुण्यात सोडले तर इंदापूर कोणत्या दिशेला हे सांगता येणार नाही : सुप्रिया सुळे

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री फक्त हेलिकॉप्टरने फिरतात मात्र त्यांना जर पुण्यात सोडले तर त्यांना कळणार नाही इंदापूर कोणत्या दिशेला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

इंदापूरमध्ये काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी सुळे म्हणाल्या, ” आजही इंदापूरमध्ये बाहेरून पाहुणे आले आहेत, मात्र त्याने काही फरक पडणार नाही. दत्ता मामांनी प्रचंड विकासकामे केलेली आहेत. मामांची सगळी कामे ही कोट्यावधी रुपयांची आहेत. विरोधात असताना मामांनी इतका निधी आणला आहे तर विचार करा सत्ता आली तर मामा इंदापूरचा किती मोठा विकास करतील. गरिबांना घरे बांधून देण्यासाठीच्या घरकूल योजनेच्या माध्यमातून मामानी कोट्यावधींचा निधी आणून गरिबांना न्याय दिला आहे.”

‘इंदापूरात दुष्काळ पडला, गारपीट झाली पण मुख्यमंत्रीही आले नाहीत आणि भाजपाचा एकही नेता इथ फिरकला नाही. मात्र अजित पवार इथे सात वाजताच दाखल झाले होते. मुख्यमंत्री फक्त इथे एकदा आले तेही मते मागायला, लोकांच्या सुखदुःखात नाही येत तर मग यांना मतदान करायचे तरी कशाला ?असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या

Loading...

Loading...

Loading...