२०३२ ऑलिम्पिक स्पर्धेची घोषणा, ‘या’ देशात होणार आयोजन

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना आगामी ऑलिम्पिक २०३२ स्पर्धेबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. २०३२ स्पर्धेसाठी काही दिवसापुर्वी घेतलेल्या मतदानानंतर ऑस्ट्रेलिया येथील ब्रिस्बेन या शहरात आगामी २०३२ ऑलिम्पिक स्पर्धा आयोजीत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा आयोजन करण्याची ऑस्ट्रेलियाची ही तिसरी वेळ आहे.

आगामी ऑलिम्पीक २०३२ स्पर्धा ही ब्रिस्बेन या शहरात आयोजीत करण्यात आली आहे. यापुर्वी १९५६ साली मेलबर्न आणि २००० साली सिडनी या शहरात ऑलिम्पीक स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचे यजमानपद भेटल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनी आनंद व्यक्त केला आहे. ३२ वर्षाच्या कालावाधीनंतर ऑस्ट्रेलियाला स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे.

ब्रिस्बेन आणि क्वीन्सलँडचे प्रशासन या स्पर्धेचे आयोजन थाटामाटात आणि आनंदाने करतील अशी आशा पंतप्रधान मॉलीसन यांनी व्यक्त केली आहे. यापुर्वी दोन वेळा स्पर्धा आयोजीत करण्याचा अनुभव असल्यामुळे आगामी स्पर्धेच्या आयोजनात फायदा होईल असे ते म्हणाले. तीन वर्षापुर्वी ऑस्ट्रेलियाने राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आगामी २०२४ ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस आणि २०२८ ऑलिम्पिक स्पर्धा लॉस अँजेलिस येथे पार पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP