Loksabha- 2019 ची लोकसभा निवडणुकही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली

नवी दिल्ली: दोन-अडीच वर्षांनतर येणाऱी 2019ची लोकसभा निवडणुकही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्याच्या निर्णयावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांची बैठक पार पडली. दिल्लीतील प्रवासी भारतीय केंद्रात झालेल्या बैठकीत एनडीएतील सर्व घटक पक्षांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत, आगामी लोकसभाही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यास मान्यता दिली.

या बैठकीस एनडीएतील घटक पक्षांचे 33 प्रतिनीधी उपस्थीत होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान मोदी यांनी भुषवले. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी या बैठकीतील माहिती पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेच्या भूमिकेकडे एनडीएतील घटकपक्षांसोबतच देशभराचे लक्ष लागले होते. शिवसेनेच्या वतीने स्वत: उद्धव ठाकरे या बैठकीस उपस्थीत होते. ठाकरे यांनीही मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आगामी लोकसभा निवडणूक मोदींच्या नेतृत्वाखाली लढण्याचे मान्य केले

युतीचे काय?

दरम्यान, लोकसभा निवडणुक मोदींच्या नेतृत्वाखाली लढविण्याचे शिवसेनेने मान्य केले. परंतु, महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती केव्हाच तुटली आहे. त्यामुळे युतीचे काय या प्रश्नाबाबत अद्याप कोणीही भाष्य केले नाही. परंतु, दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीत फारशी खळखळ न करता येकत्र येतील असे सध्याचे चित्र आहे.