तंत्र बदलणारी 2019 ची निवडणूक

social media 2019 election

अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार ) औरंगाबाद :  18 वर्षाच्या संख्येने अधिक असणाऱ्या मतदारांसाठी राजकीय पक्षांनी प्रचाराचे तंत्रच बदलून टाकले आहे. त्यामध्येही भाजपने बाझी मारली आहे. त्यामुळे 2019ची निवडणूकीच्या प्रचाराचेच तंत्र नाही तर ताळतंत्र बदललेले असणार आहे.
निवडणूक प्रचारावर जिंकली जाते, हे 2014 च्या निवडणूकीने दाखवून दिले आहे. प्रचाराचे प्रभावी माध्यमाचा योग्य वापर केला, तर ‘कोण-कोणाला कुठे नेऊन’ ठेऊ शकते हे त्या निवडणूकीने दाखवून दिले. म्हणून तोच यशाचा फंडा किंबहूना त्यापेक्षा अधिक प्रभावशाली तंत्राने भाजप 2019 च्या निवडणूकीत उतरणार आहे. त्यासाठीची भाजपची तयारी पूर्ण झाली आहे.

Loading...

काय केली तयारी?
वर्षभरापासून भाजपने त्यासाठीची तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी निवडून आलेल्या त्यांच्या पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यापासून ते खासदारापर्यंत सगळ्यांना प्रशिक्षण दिले. त्यामध्ये त्या लोकप्रतिनिधींना सोशल मिडियाचा वापर कसा करायचा? हे शिकवण्यात आले. सोशल मिडियावर ज्यांचे अकाऊंट नव्हते, त्यांना ते सुरू करून देण्यात आले. त्याचा वापर कसा करायचा? हेही प्रशिक्षणात सांगण्यात आले होते. त्यामुळे फक्त अकाऊंट उघडून ते गप्प बसले नाहीत, तर दिवशी किमान पाच पोस्ट त्यांनी सोशल मिडियावर केल्या पाहीजेत, असे बंधन घातले. त्या लाईक्स आणि फाॅलोअर्सही मिळाले पाहीजेत, याचेही बंधन होतेच की.

बंधन अगदी कार्पोरेटच्या ‘गोल’ सारखे.
भाजपने हा बदल मोदी-शहा या जोडगोळीच्या अग्राहाखातर केला. कार्पोरेट कंपन्यांमध्ये ‘टार्गेट ओरीएंटेड जाॅब’ असतात. त्याच धरतीवर त्यांनी आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना ‘टार्गेटचे गोल’ सेट करून दिले. त्याच्या ‘माॅनिटरींग’साठीची सुसज्ज अशी यंत्रणाही कामाला लावली. म्हणजे चूकन एखाद्या लोकप्रतिनिधीने दिवसभरात एकही पोस्ट सोशल मिडियावर टाकली नाही. तर त्याचे उमेदवारी देतांना ‘निगेटीव्ह’ मार्किंग करणार असल्याच्या स्पष्ट सुचना प्रशिक्षणा दरम्यान दिलेल्या आहेतच की. त्यामुळे या कडक नियमावलीचे जो काटेकोरपणे पालन करील, तोच 2019 च्या निवडणुकीत उमेदवारीला पात्र राहील, याचेही संकेत देऊन झाले आहेत. त्यामुळे ‘××’ मारत भाजपच्या इच्छूकांना आणि विद्यमानांना ‘रूल फाॅलो’ करावेच लागता आहेत.

रूल तोडण्यापूर्वीच ‘त्यांनी’ सोडले पद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही सुरूवात आपल्यापासून केली. त्यांनी ‘पीएम’ ऑफिस सकाळी नऊ ला सुरू केले. ते स्वतःच नऊ वाजता कार्यालयात जाऊन बसू लागल्यावर आपोआपच ‘शास्त्री भवन’ची उघडण्याची वेळ आकरावरून नऊवर आली. त्यात त्यांनी प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांना आपण पुढच्या शंभर दिवसांचा काय कार्यक्रम असेल, हे ‘ई-मेल’ करून सांगण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे दैनंदिन नियोजनाशिवाय आणि पुर्व परवानगीशिवाय कार्यक्रमात बदल करता येणार नाही, अशी सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे ‘चकव्या’चे राजकारण करणाऱ्या एका मराठवाड्यातील राज्यमंत्र्याची अडचण झाली. त्याच्या ‘सोई’ची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली अन् त्यांनी केंद्रातले राजकारण सोडून राज्यात येणेच हिताचे समजले. पण ‘टेक्नोक्रॅट’ न झाल्याने त्यांना पक्षाचे राज्यातील सर्वोच्च पद मिळाले, पण अधिकार ‘टेक्नोसॅव्ही’ मुख्यमंत्र्यांनी पळविले.

अद्ययावत राष्ट्रीय कार्यालय
2019च्या मिशनची सुरूवात राष्ट्रीय कार्यालयापासून केली. हे कार्यालय दिनदयाल उपाध्याय मार्गावर वसविण्यात आले आहे. त्यामध्ये या सगळ्या अद्ययावत सुविधा पुरविल्या आहेत. हे नविन तंत्र तातडीने भाजपने आत्मसाद करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे  18 वर्षाचा मतदार राजा. ज्यांची विचार करून मतदान करण्याची इच्छाही नाही केवळ भावनेच्या भरात मतदान करणारा हा मतदार टेक्नोसॅव्ही आहे. त्याला जे हवं आहे, ते सगळं देण्याची तयारी भाजपची आहे. म्हणून त्यांनी या तंत्रात इतर पक्षांच्या आधी बाजी मारली आहे.

तंत्र बदलणारी 2019 ची निवडणूक

  • जाहीर सभांची संख्या घटेल
  • प्रचारासाठी नसतील रिक्षा
  • वैयक्तिक प्रचारावर असेल भर
  • सोशल मिडायाचा होईल भरपूर वापर
  • उमेदवारी देतांनाही पाहीले जाईल ‘स्टेटस’
  • नव्या तंत्रात भाजपने घेतली आघाडीLoading…


Loading…

Loading...