क्रिकेटच्या सगळ्यात मोठया कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात

टीम महाराष्ट्र देशा : बहुचर्चीत क्रिकेटच्या सगळ्यात मोठया कुंभमेळ्याला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. या वर्ल्डकपवर जगातील सगळ्या क्रिकेटप्रेमींच लक्ष लागले आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याने वर्ल्डकपला आज दुपारी ३ वाजता सुरुवात होणार आहे.

या वर्ल्डकपमध्ये १० संघांचा समावेश असणार आहे. यावेळी प्रथमच प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहे. पहिल्या ४ क्रमांकावरील संघ सेमीफायनल साठी पात्र ठरतील. त्यामुळे प्रत्येक संघाचा भरीव कामगिरी करून पहिल्या ४ संघात राहण्यावर भर असेल. त्यामुळे ही स्पर्धा अतिशय रंगतदार असणार आहे.

या स्पर्धेत इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. यात इंग्लंड, भारत आणि ऑस्ट्रलिया हे संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. तसेच दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, न्यूझीलंड हे संघही विजेतेपद पटकावू शकतात.

भारतीय संघाबाबत बोलायचे झाल्यास फलंदाजीची मदार कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन यांच्यावर असणार आहे. तसेच हार्दिक पंड्या, केदार जाधव, रवींद्र जडेजा आणि विजय शंकर हे अष्टपैलू खेळाडू आहेत. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाज तर यजुवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव हे फिरकी गोलंदाज संघात आहेत. तसेच लोकेश राहुल हा राखीव फलंदाज तर दिनेश कार्तिक हा राखीव यष्टीरक्षक संघात आहे.

वर्ल्ड कप साठीचा भारतीय संघ पुढीलप्रमाणे-

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, एमएस धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा और मोहम्‍मद शमी.