2018 IPL: मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’ची परिस्थिती

मुंबई : मुंबई इंडियन्सची अवस्था आयपीएलमध्ये खूप दयनीय झाली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तीन वेळा विजेते पद पटकावले. सध्या मुंबईच्या खात्यात फक्त चार गुण आहेत. आता पुढील सहा सामन्यांमध्ये त्यांना जिंकाव लागेल. जर मुंबई जिंकली नाही तर तर त्यांच्यावर आयपीएलमधून बाहेर पडण्याची वेळ येईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव झाल्यामुळे मुंबईच्या बाद फेरीतील आशा धुसर दिसायला लागल्या आहेत. सध्याच्या घडीला मुंबईचा संघ सातव्या स्थानावर आहे. आठ सामन्यांमध्ये त्यांना सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे, तर दोन सामन्यांमध्येच त्यांना विजय मिळवता आला आहे.

मुंबईचे पुढील सामने

मुंबईला यापुढे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळावे लागतील. आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि राजस्थान यांच्याबरोबर प्रत्येकी एक सामना