fbpx

२०१४ च्या धुंदीतून बाहेर पडा, जदयुच्या भाजपला कानपिचक्या!

नवी दिल्ली :२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासून बिहारमध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दल (जदयू) यांच्यातील कुरबुरी वाढत चाललेली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर लगेच 2020 मध्ये होऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित केलेला नाही , तो लगेच निश्चित केला जावा, यासाठी जदयू हे भाजपाच्या मागे हात धुवून लागला आहे. मात्र, भाजपा यासाठी जास्त गंभीर नसल्याचे दिसत आहे.

जागा वाटपा विषयी जदयु नेत्यांना विचारले असता, रालोआतील सर्व घटक पक्षांनी एकत्र बसून याचा निर्णय घ्यायला हवा. जदयु नेत्यांच्या मते, सध्यपरिस्थिती लक्षात घेऊनच प्रत्येक पक्षाला जागा वाटप केल्या जाव्यात. मात्र, २०१४ प्रमाणेच भाजपला यंदाही जागा वाटपात त्यांच्या जास्त जागा अपेक्षित असतील,याकडे प्रसार माध्यमांनी लक्ष वेधले. यावर उत्तर देताना जेदायुचे नेत्यांनी म्हटले की, ही 2014 ची लोकसभा नव्हे तर 2019 ची लोकसभा निवडणूक आहे, हे आपण सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे.

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालात जनमतात बदल झाल्याचे चित्र दिसून आले.तसेच 2014 चे निकष लावायचे झाल्यास भाजपाने बिहारमध्ये 40 पैकी 31 जागांवर विजय मिळवला होता. या जागांचा विचार करता भाजपाला विधानसभेच्या 243 पैकी 173 जागांवर यश मिळू शकले असते. तर त्यावेळी जदयूला केवळ दोनच जागा जिंकता आल्या होत्या.रामविलास पासवान आणि उपेंद्र सिंह कुशवाह यांच्या पक्षालाही अनुक्रमे सहा आणि तीन जागा मिळाल्या होत्या. मग आता आगामी निवडणुकीत एवढ्याचा जागा लढवायच्या का, असा सवालही जदयूच्या नेत्यांनी विचारला. या पार्श्वभूमीवर आता भाजपा आपल्या मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यासाठी काय पाऊल उचलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

1 Comment

Click here to post a comment