गोध्रा हत्याकांड ११ दोषींना आता फाशी ऐवजी जन्मठेप

वेबटीम: 2002 मध्ये घडलेल्या गुजरातमधील गोध्रा जळीतकांडा प्रकरणी गुजरात हायकोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे. जळीतकांडातील ११ दोषींना दिलासा देत फासीची शिक्षा बदलत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. दोषीकडून २७ फेब्रुवारी २००२ मध्ये साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लावण्यात आली होती. यामध्ये आयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी २०११ मध्ये विशेष न्यायालयाने ३१ जणांना दोषी ठरवले होते. यामधील २० आरोपींना जन्मठेप आणि ११ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर ६३ जणांची मुक्तता करण्यात आली. कोर्टाच्या या निर्णयाला गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. आरोपींना देण्यात आलेली शिक्षा कमी असून निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यावर कारवाई करण्यात येण्याची मागणी गुजरात सरकारने केली होती

You might also like
Comments
Loading...