पुणे महापालिकेने जप्त केलेली तब्बल 200 वाहनं जळून खाक

पुणे- पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त करून ठेवलेल्या तब्बल 200 वाहनांना आग लागून ही वाहने जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

ही घटना मंगळवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.पुणे महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी पंकज जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हांडेवाडी सर्व्हे क्र. 56 येथे जेएसपीएम कॉलेज जवळील मैदानात हातगाडी,दुचाकी आणि चार चाकी गाड्या जप्त करून ठेवलेल्या सुमारे 200 वाहनांना आग लागून ही वाहने जळून खाक झाले आहेत. एक टँकर आणि खासगी टँकरच्या मदतीने ही आग साडेआठच्या सुमारास नियंत्रणात आणण्यात आली.

You might also like
Comments
Loading...