२०० रूपयांची नोट अजुन ATM मधे नाहीच

वेबटीम : २०० रूपयांची नवीन नोट चलनात आली तर खरी परंतु अजुन ATM मधे ती उपलब्ध होऊ शकली नाही. ATM च्या सॉफ्टवेयर मधे बदल केल्यानंतरच २०० रूपयांची नवीन नोट आपल्याला मिळतील. ATM मधे काही तांत्रिक बदल करण्याच काम सध्या चालू आहे त्यामुळे काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

सध्या अनेक बँकांनी आपापल्या एटीएम मशिन्समध्ये आवश्यक बदल करण्याचे काम हाती घेतलेय. यासाठी सध्या २०० रूपयांच्या नव्या नोटेचे परीक्षण सुरू आहे. मात्र, अद्याप बँकापर्यंतही या नोटा पुरेशा प्रमाणात न पोहोचल्यामुळे या कामात अडथळे येत आहेत. यापूर्वी नोटाबंदीनंतर जेव्हा ५०० आणि २००० रूपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या होत्या, तेव्हाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा ५०० आणि २००० रूपयांच्या नोटांच्यादृष्टीने ATM मशिन्स अनुकूल बनवण्यासाठी बराच कालावधी लागला होता. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.