देशभरात २ वर्षात धावतील इलेक्ट्रिक बस

टीम महाराष्ट्र देशा:- पेट्रोल डिझेलच्या वाहनांना पर्याय असलेल्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस येत्या २ वर्षात देशभरात धावताना दिसतील. या बस पेट्रोल डीझेल इंधनाला पर्यायी असल्याने सरकारचा कोणताही दबाव असणार नाही. अशी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगातील ऊर्जा कार्यक्षमता’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

गडकरी म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी देशात नव्या वाहनांच्या उत्पादनासोबत इलेक्ट्रिक वाहतूक व्यवस्था तयार करण्यात येईल. त्यासाठी विजेपासून ग्रीन पावर तयार करण्याच्या इंधन पर्याय स्वस्त आहे. त्यामुळे वेगळी इलेक्ट्रिक वाहने बनविणे बंधनकारक करण्याची आवश्यकता नसेल.

तसेच पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदीची गरजही पडणार नाही. नीती आयोगाने देशातील दुचाकी वाहने २०२३ आणि तिनचाकी वाहने २०१५ पर्यंत पेट्रोल आणि डिझेलविरहित करण्यासंबंधी आदेश दिले होते. मात्र नीती आयोगाने सुचवलेल्या पेट्रोल आणि डिझेल विरहित दुचाकी आणि तिनचाकी वाहने तयार करण्यासाठीच्या निर्णयाला गडकरींनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. भारतीय वाहन क्षेत्रात आलेल्या दोन दशकांतील सर्वांत मोठ्या मंदीचा मुकाबला करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या