आयपीएल अजूनच रंगतदार ; अजून दोन संघांची पडणार भर

टीम महाराष्ट्र देशा : २०२० ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा आता आणखीच रंगतदार होणार आहे. कारण बीसीसीआयने आयपीएलमधील संघ संख्या ८ वरून १० करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

नव्या दोन संघांसाठी टाटा ( रांची, जमशेदपूर), अदानी ग्रुप ( अहमदबाद) आणि आरपीजी संजीव गोयंका ( पुणे) या कॉर्पोरेट्समध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. यापूर्वी पुण्याचा संघ या स्पर्धेत होता परंतु अहमदाबाद आणि रांची किंवा जमशेदपुरचे संघ यापूर्वी आयपीएलमध्ये खेळलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. याशिवाय या स्पर्धेत खेळण्यासाठी लखनौ आणि कानपूर हेही संघ उत्सुक आहेत तसेच यापूर्वी आयपीएलमध्ये सहभाग नोंदवलेला कोचि टस्कर्स, केरळ संघही पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, बीसीसीआयच्या या निर्णयामुळे प्रेक्षकांच्या आनंदात अजूनच भर पडणार आहे. तसेच नवीन खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी या दोन संघांच्या माध्यमातून मिळणार आहे.