नवाजुद्दीन सिद्दीकीचे आणखी 2 चित्रपट रिलीजसाठी सज्ज

Nawazuddin Siddiqui

मुंबई : देशभरात कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन वाढत आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांचे शूटिंग थांबले आहे, थिएटर बंद असल्यामुळे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. त्याचबरोबर टीव्ही मालिकांचे शुटिंगही थांबले आहे. अशा परिस्थितीत ओटीटी प्लॅटफॉर्म घरात प्रेक्षकांसाठी मनोरंजन करण्याचे एक नवीन साधन म्हणून उदयास आले आहे. दरम्यान, बरेच निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत.

अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना स्टारर फिल्म ‘गुलाबो सीताभो’, विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ यासारखे चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास तयार आहेत. त्याचबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘घुमकेतू’ देखील झी 5 वर रिलीज झाला असून आता नवाझुद्दीनचे आणखी दोन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त न्यूज १८हिंदी ने दिले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीची ‘रात अकेली है’ आणि ‘बोले चूड़ियां’ देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतात. तमन्ना भाटिया बोले चूड़ियांमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत दिसली आहे, तर राधिका आपटे ‘रात अकेली है’ मध्ये दिसणार आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकीचे हे दोन्ही चित्रपट पूर्ण झाले आहेत. पण, चित्रपटगृह कोरोनामुळे बंद आहेत, अशा परिस्थितीत दोन्ही चित्रपट ओटीटीच्या व्यासपीठावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

‘बोले चूड़ियां’ चित्रपटाचे सह-निर्माता राजेश भाटिया अलीकडेच म्हणाले होते की, हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावा, यापेक्षा काहीही चांगले असू शकत नाही. राजेश यांच्या म्हणण्यानुसार, ‘सिनेमा हॉलसुद्धा खुले असतील पण सध्याच्या परिस्थिती पाहता हे स्पष्ट झाले आहे की काही काळ उपलब्ध असलेला चित्रपटांना प्रतिसाद मिळणार नाही’.

#corona : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41 हजारांपुढे

या अभिनेत्रीचे हे ‘असले’ फोटो होत आहेत व्हायरल ; वाचा काय आहे प्रकरण

‘मजुरांना केवळ कोरडे रेशन देऊन चालणार नाही, त्यांना भाजीपाल्यासाठी रोख रकमेची गरज’