गुजरातमध्ये २ लाख ७३ हजार बनावट रेमडेसिवीर जप्त

remdesivir

नवी दिल्ली – वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठी मागणी आली आहे. त्यामुळे इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. सरकारने निर्बंध लावूनही याचे प्रमाण वाढतच आहे. गुजरातेत तब्बल २ लाख ७३ हजार बनावट रेमडेसिविर इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. एकीकडे देशात रेमडेसिविरची प्रचंड टंचाई असताना दुसरीकडे बनावट इंजेक्शनची विक्री होत असल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्लीच्या फतेहपूर बेरी ठाण्याच्या पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. दाेन जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी एक-एक रेमडेसिविर इंजेक्शन ७० हजार रुपयांत विकत होते. त्यांच्याकडून तीन इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. गुरुग्राममध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याच्या आरोपात एका महिलेसह तीन नर्सिंग स्टाफला अटक करण्यात आली आहे. हे लोक एक रेमडेसिविर इंजेक्शन ४५ हजार रुपयांत विकत होते.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत जनजागृती अभियानांअतर्गत एक ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी फेक रेमडेसिवीर चालवणाऱ्या विषयी माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी एक फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन कसं असंत याविषयी सांगण्यात आलं आहे. दिल्ली पोलीस दलातील अधिकारी मोनिका भारद्वाज यांनी बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन बनवणाऱ्यांविषयी काही माहिती दिली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या बॉक्स वर COVIPRI हे नाव लिहिलेलं असे तर ते बनावट इंजेक्शन असतं. त्यामुळं असा उल्लेख असणारं इंजेक्शन खरेदी करु नका, असं सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या