दोन लाख फुकट्यांवर रेल्वेची दंडात्मक कारवाई

indian railway

पुणे: प्रतिनिधी-   भारतीय रेल्वे जगातील सर्वांत मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. याच जगप्रसिद्ध रेल्वेमधून काही फुकटे प्रवासीही प्रवास करतात. 2 लाख 8 हजार  फुकट्या प्रवाशांनी प्रवास केल्याचे उघड झाले आहे. या फुकट्या प्रवाशांवर पाळत ठेवून त्यांच्याकडून ९ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवास करणार्‍या फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई सुरूच असून यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तब्बल  लाख  हजार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल कोटी ९९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. मागील वर्षी ऑगस्ट २०१६ मध्ये  कोटी १२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून यंदाच्या वर्षी यात २६ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. एप्रिल २०१७ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत तब्बल १४ लाख  हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, योग्य तिकीट काढूनच रेल्वेने प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे. 

विनातिकीट प्रवास हा सामाजिक गुन्हा

विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांनी प्रवासी भाडय़ाच्या दहापट रक्कम भरण्याचे नाकारल्यास कलम ४६० अन्वये एक महिना पोलिस कोठडी व २०० रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात. रेल्वे प्रवास करताना योग्य तिकीट खरेदी करणे प्रवाशाला बंधनकारक असून, विनातिकीट प्रवास करणे सामाजिक गुन्हा आहे. आर्थिक नुकसान व मानहानी टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य तिकीट खरेदी करून प्रवास करावा आणि तिकिटावर प्रमाणित प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.विनातिकीट प्रवास करतात.किवां घेतलेल्या तिकिटापेक्षा अधिक अंतराचा प्रवास करणा-यांविरोधात रेल्वेने  मागील दोन वर्षापासून अशा प्रवाशांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे.