कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे सोलापुरातील अस्तित्व धोक्यात, ‘हे’ दोन बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकी आधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्के बसत आहेत. कारण अनेक निष्ठावान आणि अनुभवी नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत सत्ताधारी भाजप-सेनेमध्ये प्रवेश केला आहे. आता सोलापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने 27 ऑगस्ट तर आ. दिलीप सोपल 31 ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार आ. दिलीप सोपल हे राष्ट्रवादीचे अनुभवी नेते अखेर पक्षाला राम राम ठोकणार आहेत. आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेही कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल होणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या जाण्याने कॉंग्रेस आघाडीला सोलापूर जिल्ह्यात नक्कीचं फटका बसणार आहे.

आ. दिलीप सोपल हे पक्षांतर करणार असल्याची खूप दिवस चर्चा होती. मात्र अखेर 31 ऑगस्टचा मुहूर्त साधत दिलीप सोपल शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दिलीप सोपल हे बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते तब्बल ५वेळा बार्शी विधानसभा मतदार संघातून आमदार झाले आहेत. दिलीप सोपल यांचे बार्शी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आपल्या गोटातील हुकमी एक्का गमावत असल्याचं दिसत आहे.