गणेश भुतकर खून प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातून 2 आरोपींना अटक

shanishingnapur-murder-case

अहमदनगर : 21 डिसेंबर रोजी सायंकाळी जमिनीच्या वादातून गणेश भुतकर याचा शनिशिंगणापूर मध्ये खून केल्याच्या प्रकरणातील 2 फरार आरोपींना पोलीसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मध्ये अटक केली आहे.दरम्यान या प्रकरणातील 2 प्रमुख आरोपी मात्र अद्यापही फरारच आहेत.लखन उर्फ लाखन नामदेव ढगे(वय 30) व भाऊसाहेब उर्फ दादासाहेब रायभान ढमाले(वय 28)अशी पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

21 डिसेंबरच्या सायंकाळी अविनाश बानकर व गणेश सोनवणे यांनी आपल्या साथीदारां सहीत गणेश भुतकर जोरदार हल्ला करून त्याची हत्या केली होती.शनिशिंगणापूर मधील गजबजलेल्या वाहन तळाजवळ खुनाची ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती.या प्रकरणी 7 जणांच्या विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी यापूर्वी पंकज बानकर,मयुर हरकळ,अर्जुन महाले या तीन आरोपींना दोन दिवसांमध्येच अटक केली होती.दरम्यान भुतकर खून प्रकरणातील आरोपी गंगापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून एलसीबी चे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गंगापूर येथे कारवाई करीत ढगे व ढमाले या 2 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आतापर्यंत 5 जणांना गजाआड केले असून अविनाश बानकर व गणेश सोनवणे हे दोन प्रमुख आरोपी मात्र अद्याप ही फरारच आहेत.