महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक

ठाणे  : पैशाचे आमिष दाखवून महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली. तर वेश्याव्यवसाय करण्यास बळी पडणा-या तीन महिलांची सुटका करण्यात आली. तब्बसुम मुस्तकीम शेख आणि मोहम्मद हनीफ मोहम्मद युसुफ शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून नगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक मानवी तस्करी विरोधी पथकाच्या अंशिता मिसाळ यांना याप्रकाराविषयी गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, पोलीस पथकाने जांभळी नाका येथील हॉटेलवर छापा टाकत तीन महिलांची सुटका केली.

Comments
Loading...