‘बिचाऱ्या सोमय्यांना काहीच माहिती नसावं! ते कोल्हापूरला आले असते तर त्यांना समजलं असतं’

मुंबई : शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री माझ्या रडारवर आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आज म्हणजेच सोमवारी यातील एका मंत्र्याचा भ्रष्टाचार माध्यमांसमोर उघडे करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितलं होतं. आज त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच, यासाठी २७०० पानांचे पुरावे देखील सादर केल्याचं ते म्हणाले आहेत. यावरुन आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

किरीट सोमय्यांना बिचाऱ्यांना काही माहिती नसावं. ते कोल्हापूरला आले असते, तर त्यांना स्पष्टपणे खरी परिस्थिती समजली असती”, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. तसेच, किरीट सोमय्यांवर येत्या दोन आठवड्यांमध्ये १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं देखील मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं आहे.

किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरमधील साखर कारखान्याविषयी किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘हजारो शेतकऱ्यांनी यामध्ये पैसे गुंतवले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना आपला कारखाना हवा होता. त्यावेळी सरकारने सहकारी कारखान्यांची नोंदणी बंद केली होती. म्हणून हा प्रायव्हेट लिमिटेड कारखाना काढावा लागला, असं मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.

ज्या दिवशी आम्हाला परवाना मिळाला आणि आवाहन केलं, तेव्हा एकाच दिवशी १७ कोटी रुपये जमा झाले. ४ दिवस लोक नोटा मोजत होते. कारण सगळ्या शेतकऱ्यांना ५, १०, ५० रुपयांच्या देखील नोटा दिल्या होत्या. त्यानंतर हजारो लोकांनी पैसे दिले. त्याची देखील कोल्हापूरच्या आयकर विभागाकडून तपासणी झाली. हजारो शेतकऱ्यांची चौकशी झाली. बँकांची पासबुकं देखील तपासली. त्यानंतर देखील हे पैसे आले, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :