युतीची खलंबत ; मातोश्रीवर अतिशय महत्वाची बैठक

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यास आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. मात्र अजूनही युती संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. इकडे शिवसेनेने मतदारसंघ निहाय जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार असलेला आणि नसलेलाही मतदारसंघांचा आढावा गेले काही दिवस मातोश्रीवर घेतला जातोय.

आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते आणि खासदार यांची महत्वाची बैठक मातोश्रीवर होणार आहे. या बैठकीत लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार असलेल्या उमेदवारांवर शेजारील मतदारसंघाचीही जबाबदारी देण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्याच बरोबर शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्यांच्यी जबाबदारीही देण्यात येणार आहे.

या बैठकीनंतर शिवसेना महाराष्ट्रातील ४८ पैकी किती लोकसभा मतदार संघात सक्रिय ताकत लावणार हे निच्छित होईल. त्यामुळे शिवसेना युती करणार की नाही करणार. तसेच किती जागांसाठी शिवसेनेची जय्यत तयारी सुरू आहे. याची उत्तरे मिळू शकतील